मंत्रालय प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश’ ॲप आवश्यक – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

 

मंत्रालयात प्रवेश ही एक गंभीर प्रक्रिया असते. सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यावश्यकही आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एक अत्याधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली लागू केली आहे – डीजीप्रवेश (Digi Pravesh)
हे ॲप वापरून नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी आता अत्यंत सुलभ व सुरक्षित पद्धतीने मंत्रालयात प्रवेश करू शकतात. या ब्लॉगमध्ये आपण डीजीप्रवेश प्रणालीची संपूर्ण माहिती, त्याचा वापर कसा करायचा, नोंदणीची प्रक्रिया, आणि महत्त्वाच्या सूचना यावर सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

Digi Pravesh म्हणजे काय?
        
     डीजीप्रवेश (Digi Pravesh) ही एक डिजिटल प्रवेश प्रणाली आहे, जी चेहरा ओळख (Facial Recognition) आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख निश्चित केली जाऊ शकते आणि त्याद्वारे सुरक्षित व सुगम प्रवेश मिळतो.

ही प्रणाली दोन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात आली आहे:

  • टप्पा १: चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रणाली.

टप्पा २: व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम – अभ्यागतांसाठी स्मार्ट प्रवेश नियंत्रण

Digi Pravesh ॲप डाउनलोड कसे करावे?

डीजीप्रवेश’ हे ॲप Android आणि iOS दोन्ही प्रकारच्या मोबाईल प्रणालींवर उपलब्ध आहे.

डाऊनलोड करण्यासाठी:

  1. Android वापरकर्त्यांनी Google Play Store वर ‘Digi Pravesh’ सर्च करा.
  2. iPhone वापरकर्त्यांनी Apple App Store वर ‘Digi Pravesh’ शोधा.
  3. ॲप विनामूल्य आहे व त्यात जाहिराती नाहीत.

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया – तीन मिनिटांत प्रवेश!

नोंदणीसाठी आता तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही. खाली दिलेली प्रक्रिया फक्त तीन मिनिटांमध्ये पूर्ण करता येते:

नोंदणी कशी करावी?

  1. ॲप उघडा व Aadhaar आधारित नोंदणी पर्याय निवडा.
  2. आधार क्रमांक व OTP टाकून प्रमाणीकरण करा.
  3. तुमचे छायाचित्र, विभागाचे नाव आणि कामाचे कारण भरून सबमिट करा.
  4. यानंतर तुम्हाला एक QR कोड मिळेल.
  5. हा QR कोड मंत्रालयाच्या बाहेर खिडकीवर दाखवा.
  6. तुम्हाला RFID कार्ड वितरीत करण्यात येईल.
  7. हे कार्ड गळ्यात घालून प्रवेश घ्या.
  8. मंत्रालयातून बाहेर जाताना हे कार्ड सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत द्या.
कोणासाठी आवश्यक?

डीजीप्रवेश प्रणाली खालील व्यक्तींना वापरणे बांधनकारक आहे:

  • राज्यभरातील क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी
  • मंत्रालयात येणारे अभ्यागत (visitors)
  • विभागीय बैठकीसाठी आमंत्रित अधिकारी
  • कोर्ट/सुनावणीसाठी येणारे वकील/नागरिक
बैठक व सुनावणीसाठी मार्गदर्शक सूचना:
  • बैठकीसाठी येणाऱ्यांनी बैठक पत्रक कमीतकमी एक दिवस आधी ॲपवर अपलोड करणे आवश्यक आहे.
  • एका विभागातून जास्तीत जास्त दोन अधिकारीच उपस्थित राहू शकतात.
  • गृह विभागाच्या सूचनेनुसार शक्य असल्यास ऑनलाइन सुनावणीला प्राधान्य द्यावे.

  • प्रवेश वेळ व मर्यादा
    • सकाळी १०:०० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल.
    • संबंधित विभागाच्या संमतीनंतरच प्रवेश अनुमती मिळेल.
    • नोंदणी झालेल्यांनाच प्रवेश मिळणार असल्यामुळे गोंधळ, गर्दी टळणार आहे.
सुरक्षा आणि गोपनीयता

डीजीप्रवेश प्रणालीमध्ये वापरलेली माहिती पूर्णतः सुरक्षित ठेवण्यात येते. या यंत्रणेद्वारे:

  • व्यक्तीची ओळख सुनिश्चित केली जाते.
  • अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाकारला जातो.
  • मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम बनते.

या प्रणालीचे फायदे:
  • वेळेची बचत – रांगेत उभं राहायचं टळतं.
  • आधुनिक चेहरा ओळख प्रणाली.
  • डिजिटल व पेपरलेस प्रक्रिया.
  • पारदर्शक आणि सुरक्षित प्रवेश.
          ✅ माहितीचा उपयोग केवळ ओळख पटवण्यासाठी

महत्त्वाच्या सूचना:

  1. नोंदणी केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
  2. RFID कार्ड वापरूनच मंत्रालयात प्रवेश मिळेल.
  3. प्रवेश ओळखपत्र (ID) गळ्यात लावणे अनिवार्य आहे.
कार्ड परत न दिल्यास पुढील प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

App Download Links:

Google Play Store वरून डाउनलोड करा

Digi Pravesh


Post a Comment

0 Comments